|
चांदण चांदण झाली रात लिरिक्स - moonlit night
चांदण चांदण झाली रात,
एकविरीची पाहत होते वाट .....
पुण्याचा सोनार बोलवा ग
आईला नथनि घडावा ग .....
हळदी ग कुंकवाच घेऊन ताट
एकविरीची पाहत होते वाट .....
चांदण चांदण झाली रात,
एकविरीची पाहत होते वाट .....
ठाण्याचा कासार बोलवा ग
आईला बांगड्या भरा ग .....
लिंब ग नारळाच घेऊन ताट,
एकविरीची पाहत होते वाट .....
चांदण चांदण झाली रात,
एकविरीची पाहत होते वाट .....
रायगड चा लोहार बोलवा ग,
आईला त्रिशूल घडावा ग .....
उदो ग कोंबड्याच घेऊन ताट,
एकविरीची पाहत होते वाट .....
चांदण चांदण झाली रात,
एकविरीची पाहत होते वाट .... |
|
|
|